Saturday, September 8, 2012

हृदयस्पर्शी क्षण

किती वाटा ........
चुकल्यामुळे चुकलेल्या .........चुकवल्यामुळे  न भेटलेल्या ...........
राहूनच गेलेल्या ........

किती योगायोग .........
हुकलेले, न आलेले, येऊनही न उमजलेले ............
धुक्यात हरवलेले ..........

किती राहून गेलेले  .............
ठरवलेले, न ठरवलेले, कल्पनेतही न आलेले ............
अदृष्टात लपवलेले ............

किती चुकामुक ............
हे सगळे एक वेगळे जग ............
आपलेच, पण आपल्याशिवायचे .............  

काळजाशी गुंतून राहिलेले .........
पण तसे केव्हांच, आभाळाशी पोहोचलेले ...............

No comments:

Post a Comment